Thursday, December 9, 2010

Comments for Jaitapur Nuke Plant

रमाकांत दाणी  - सकाळ वृत्तसेवा नागपूर -  राज्याच्या सर्वच भागात वीजप्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, कुठल्याही विशिष्ट भागावर अन्याय करण्याचे धोरण बाळगले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. डिसेंबर 2012 पर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या दृष्टीने वीजनिर्मितीत वाढ करण्याचे नियोजन असून, कुठल्याही परिस्थितीत ते पूर्ण केले जाईल. भारनियमनमुक्ती करताना मोठे प्रकल्प (1 हजार मेगावॉटच्या वरचे) असलेल्या जिल्ह्यांना प्रधान्य दिले जाईल, असेhttp://www.globalmarathi.com/SearchNews.aspx?tag=%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0ही त्यांनी सांगितले.
Thursday, December 09, 2010 AT 07:27 PM (IST)
राजेश चरपे  - सकाळ वृत्तसेवा नागपूर -  जैतापूर अणुऊर्जा आणि औष्णिक वीजप्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ आणि कोकणाला उद्‌ध्वस्त करण्याचे षड्‌यंत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने रचले आहे. राज्यात फक्त चार हजार मेगावॉट विजेची टंचाई असताना, निर्मिती मात्र दीड लाख मेगावॉटची केली जात आहे. ही बाब अनाकलनीय असून, बळजबरीने शेतकऱ्यांचे पाणी आणि जमिनी हिसकावून घेतल्यास ठोशास ठोशाने उत्तर देण्यात येईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेचे रामदास कदम यांनी दिला.
Thursday, December 09, 2010 AT 07:08 PM (IST)
पुणे -  जैतापूर आण्विक वीज प्रकल्प रद्द करा आणि अटकेत असलेल्या आंदोलकांची सुटका करा, अशी मागणी कोकणवासीय महिला, तरुण आणि कष्टकरी महिलांनी "कॉंग्रेस आय'कडे केली आहे. कोकणवासीय महिला, तरुण आणि कष्टकरी महिलांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ज्ञानेश्‍वर पादुका चौकातून कॉंग्रेस भवनपर्यंत मोर्चा काढला होता. कोकणचा विकास करायचा असेल तर, शेती, मच्छीमारी व जंगल संपत्तीचा विकास करा. मात्र अणुभट्या कोकणात आणू नका. अशा मागणीचे निवेदन त्यांनी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्याकडे दिले.
Wednesday, December 08, 2010 AT 07:55 PM (IST)
आठवड्यातून दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी घेणार राजापूर- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील जेलभरो आंदोलन प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झालेल्या चौदांपैकी बारा जणांना रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायाधीश दिवाकर रत्नाकर यांनी आज प्रत्येकी 15 हजाराच्या वैयक्तिक जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना आठवड्यातून दोनवेळा नाटे पोलिस ठाण्यावर हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
Wednesday, December 08, 2010 AT 07:40 PM (IST)
प्रकल्पाला विरोध नसल्याचा भाजपचा खुलासा नवी दिल्ली- जैतापूर या देशातील पहिल्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध सुरू केला असला, तरी याच शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मात्र जैतापूरला पक्षाचा विरोध नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. "आधी समाधानकारक पुनर्वसन मग प्रकल्प,' अशी भूमिकाही पक्षाने घेतली असली, तरी या निमित्ताने युतीतील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Wednesday, December 08, 2010 AT 07:10 PM (IST)
रत्नागिरी -  गेल्या काही वर्षांत कोकणात कमी झालेला दबदबा निर्माण करण्यासाठी शिवसेनेने आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्‌द्‌याला हात घालून कोकणवासियांची मने जिंकण्याचा प्रयोग सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प हाकलून लावू, असे घोषित करुन शिवसेनेने प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नारायण राणे यांनाही शह देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसत आहे. या प्रयोगाचा पहिला प्रयोग कालच (ता. 6) राजापूर येथील नाट्ये आणि माडबन येथे झाला.
Tuesday, December 07, 2010 AT 06:40 PM (IST)
  -  जैतापूर अणुविद्युत प्रकल्पाला मिळालेला हिरवा कंदील आणि रत्नागिरी गॅस पॉवर प्रकल्पाची उत्तम स्थिती पाहता धोपावे येथील औष्णिक विद्युत प्रकल्प बहुधा रद्द होण्याची चिन्हे आहेत. अधिकृतपणे याबाबतची घोषणा राज्य सरकार, महाजेनकोकडून झालेली नसली, तरी तशी शक्‍यता आहे. गुहागर तालुक्‍यात रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर धोपावे, वेलदूर, पवारसाखरी या ग्रामपंचायतींच्या हद्दीत औष्णिक विद्युत प्रकल्प नियोजित आहे.
Tuesday, December 07, 2010 AT 06:40 PM (IST)
भारत-फ्रान्समध्ये महत्त्वपूर्ण करार भारत भेटीवर आलेले फान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी आणि प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यात काल बोलणी झाली. यावेळी उभय देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर चर्चा करून मान्यता देण्यात आली. नागरी अणु सहकार्य, संरक्षण, अवकाश विज्ञान, शिक्षण व संशोधन या क्षेत्रांशी हे करार संबंधित आहेत. फ्रान्सच्या मदतीने महाराष्ट्रात जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पात दोन अत्याधुनिक स्वरुपाच्या अणु भट्‌ट्या स्थापन करण्याच्या करारावरही सह्या झाल्या.
Tuesday, December 07, 2010 AT 10:48 AM (IST)
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जर जैतापूर अणुप्रकल्प स्थानिकांच्या माथी मारत असतील, तर पृथ्वीराजांचे पार्सल दिल्लीला परत पाठवू, असा इशारा शिवसेनेचे आ. सुभाष देसाई यांनी नाटे आणि माडबन येथील सभेत दिला.
Tuesday, December 07, 2010 AT 05:47 AM (IST)
जैतापूर येथील प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन केले, तर तेथील नियोजित अणु ऊर्जा प्रकल्पाला आपला पाठिंबा राहील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पुण्यात स्पष्ट केले.
Tuesday, December 07, 2010 AT 05:47 AM (IST)
भारत व फ्रान्स यांच्यामध्ये सोमवारी अणुभट्ट्या उभारण्याबाबत करार झाला. या करारानुसार फ्रान्स भारतात सहा अणुभट्ट्या उभारणार असून यातील पहिल्या दोन भट्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जैतापूर प्रकल्पाला मिळणार आहेत.
Tuesday, December 07, 2010 AT 05:47 AM (IST)
मुंबई -  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची वास्तववादी परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रदेश भाजपने एक समिती नेमली असून पक्षाचे ठाणे विभाग अध्यक्ष सुरेश हावरे त्याचे निमंत्रक असतील. जैतापूर प्रकल्पाविरोधातील आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून सरकारने दडपण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. हावरे यांची समिती प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार व विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना या आठवड्यात अहवाल सादर करणार आहे.
Monday, December 06, 2010 AT 06:47 PM (IST)
महाराष्ट्राची वीजेची समस्या सोडवणारा महत्त्वाकांक्षी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये आज (सोमवारी) सहकार्य करारावर सह्या झाला. जैतापूरकरांचा कराराला विरोध असला तरी केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
Monday, December 06, 2010 AT 05:47 PM (IST)
नवी दिल्ली, ६ डिसेंबर/विशेष प्रतिनिधीभारत-फ्रान्स यांच्यातील ऐतिहासिक अणुसहकार्य करारामुळे जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी दोन अणुभट्टय़ा मिळणार आहेत. या करारासह पंतप्रधान मनमोहन सिंग आणि फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सारकोझी यांच्या उपस्थितीत आज दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये उभय देशांमध्ये एकूण सात करार करण्यात आले. ...
Monday, December 06, 2010 AT 02:31 PM (IST)
जैतापूर अणुवीज प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान शनिवारी अटक झालेल्या १३०० आंदोलकांची रविवारी सुटका करण्यात आली. मात्र आंदोलनाच्या नेत्यांपैकी माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, वैशाली पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
Sunday, December 05, 2010 AT 08:20 PM (IST)
राजापूर -  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी काल (ता. 4) जेलभरो आंदोलन झाल्यानंतर आज माडबन पंचक्रोशीमध्ये शांतता आहे मात्र तणावाचे वातावरण कायम आहे. प्रकल्पाचे सध्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्वीचा असलेला पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. कालच्या जेलभरो आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांपैकी 1 हजार 130 आंदोलकांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये जिल्हाबंदी घातलेले माजी सरन्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील आणि कोकण बचाव समितीच्या वैशाली पाटील यांचा समावेश आहे.
Sunday, December 05, 2010 AT 06:40 PM (IST)
जैतापूर -  केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मंजूरीमुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असताना काल (ता. 4) अभूतपूर्व झालेल्या जेलभरो आंदोलनामुळे प्रकल्पाला असलेला विरोध दाखवून दिला. या पार्श्‍वभूमीवर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आज दुपारी जैतापूर पंचक्रोशीतील गावांना भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. यावेळी राजन साळवी म्हणाले, ""जात, धर्म आदी गोष्टींचा विचार न करता प्रकल्पग्रस्त म्हणून आपण सर्वजन एकत्र येऊन या अणुउर्जा प्रकल्पाला कडाडून विरोध करु या.
Sunday, December 05, 2010 AT 06:40 PM (IST)
कोकणातील जैतापूर येथे अणुउर्जा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांसोबतच आता शिवसेनेने देखील विरोध केला आहे. भूमिपुत्रांची डोकी फोडून जैतापूर प्रकल्प उभारता येणार नाही, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Sunday, December 05, 2010 AT 05:50 PM (IST)
नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून सरकार आणि नागरिक यांच्यातील संघर्ष वाढीस लागला असून, फ्रान्सचे अध्यक्ष निकोलास सारकोझी यांच्या भारतभेटीचा योग साधून माडबन येथे शनिवारी 'जेलभरो' आंदोलन करण्यात आले. यावेळी १३०० आंदोलनर्कत्यांना अटक करण्यात आली.
Sunday, December 05, 2010 AT 06:56 AM (IST)
विकासप्रकल्प पर्यावरणविरोधी आहेत ही समजूत जनमानसात रुजते आहे. पण या विषयाकडे काळा आणि पांढरा या दोन रंगातच पाहिले जाते. या दोन टोकाच्या रंगांमध्ये करड्या रंगाच्या अनेक छटा आहेत, हे आपण विवेकबुद्धीने समजून घेणार आहोत की नाही, हा प्रश्न जैतापूर प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उभा राहिला आहे...

No comments:

Post a Comment