Monday, December 6, 2010

जैतापूर प्रकल्प हाणून पाडू शिवसेनेचा निर्धार अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माडबनमध्ये प्रचंड मोर्चा


अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माडबनमध्ये प्रचंड मोर्चा
रत्नागिरी, दि. ६ (प्रतिनिधी) - अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध आहे. तुम्ही एकजुटीने लढलात तर हा प्रकल्प येथून हटल्याशिवाय राहणार नाही. अधिवेशन संपल्यानंतर माडबन येथे विराट मोर्चा काढला जाईल. या मोर्चाला शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थित राहतील, अशी घोषणा शिवसेना विधीमंडळ पक्षनेते सुभाष देसाई यांनी आज माडबन येथे केली.
जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. शनिवारी या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी पोलिसांच्या दंडुकेशाही व दडपशाहीला न जुमानता मोर्चा काढला होता. प्रकल्पाविरोधात लढणार्‍या या ग्रामस्थांना पाठबळ देण्यासाठीच शिवसेनेच्या ११ आमदारांचे शिष्टमंडळ माडबन आणि नाटे येथे आले होते. सुभाष देसाई यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेना नेते दत्ताजी नलावडे, आमदार रवींद्र वायकर, एकनाथ शिंदे, परशुराम उपरकर, राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजन विचारे, भरत गोगावले, बालाजी किणीकर, रुपेश म्हात्रे, दौलत दरोडा शिष्टमंडळात होते. यावेळी बोलताना देसाई पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात की मी दिल्लीत असतानाच हा प्रकल्प राजापुरात आणला. जर विकास करायचा होता तर तो प्रकल्प कराडमध्ये न्यायचा. हा दिल्लीहून आलेला प्रकल्प आणि दिल्लीचे पार्सल आम्ही परत पाठवू.’आंदोलनाच्या वेळी प्रकल्पाविरोधात लढणार्‍या ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेला अत्याचार शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दूरचित्रवाणीवर पाहिला. तुमच्यावर झालेला अन्याय, तुमचे दु:ख त्यांनी जाणले. म्हणून त्यांनी तुम्हाला पाठबळ देण्यासाठीच आम्हाला पाठविले आहे, असे दत्ताजी नलावडे म्हणाले. तसेच हल्ली इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना हिंदुस्थानचेे डोहाळे लागले आहेत. आज ही जनता येथे प्रकल्पाविरोधात रडते आहे, लढते आहे आणि तिकडे या देशाचे पंतप्रधान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मेजवानी देण्यात मग्शुल आहेत अशी टीकाही नलावडे यांनी केली. शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने साखरीनाटेबरोबरच माडबन येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली.
दरम्यान, अटकेत असलेल्या न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आणि संघर्ष समितीच्या निमंत्रक वैशाली पाटील यांना १०डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांना आयाबहिणी आहेत का?शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दौर्‍यामध्ये सर्वप्रथम साखरीनाटे येथील मच्छीमारांची भेट घेतली. यावेळी येथील मच्छीमारांनी विशेष करून महिलांनी पोलिसांनी आपल्यावर केलेल्या अत्याचाराचे गार्‍हाणे मांडले. पोलिसांनी अशी कितीही दडपशाही केली तरी आम्ही मागे हटणार नाही असेही या महिलांनी ठणकावून सांगितले. त्यावर सुभाष देसाई यांनी महिला आंदोलकांवर लाठीचार्ज करणार्‍या पोलिसांना आयाबहिणी आहेत का असा सवाल केला. ग्रामस्थांनी कंपनीच्या माणसांना जागा, अन्नपाणी देऊ नये म्हणजे ते आपोआप गाव सोडून जातील. तसेच या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा निघायला हवा अशी अपेक्षाही देसाई यांनी व्यक्त केली.
उध्दव ठाकरे संवेदनशील नेतेआंदोलनाच्यावेळी प्रकल्पाविरोधात लढणार्‍या ग्रामस्थांवर पोलीसांनी केलेला अत्याचार शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दूरचित्रवाणीवर पाहिले. तुमच्यावर झालेला अन्याय, तुमचे दुख त्यांनी जाणले. म्हणून उध्दवजींनी आम्हाला तुम्हाला पाठबळ देण्यासाठीच या सर्व आमदारांसह माडबन येथे पाठवले असे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी नलावडे यांनी सांगितले. तसेच हल्ली इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना भारताचे डोहाळे लागले आहेत. आज ही जनता येथे प्रकल्पाविरोधात रडते आहे. लढते आहे. आणि तिकडे या देशाचे पंतप्रधान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मेजवानी देण्यात मग्शुल आहेत अशी टिका त्यांनी केली.





अण्णांचे जर आणि तरमाडबन अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन झाले तरच आमचा प्रकल्पाला पाठिंबा राहील. अन्यथा विरोध असेल.





* प्रकल्पाविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेलच, पण त्याचबरोबर कायदेशीर लढाही पुकारेल. ग्रामस्थांना लोकशाहीच्या मार्गाने लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.
- सुभाष देसाई, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते

No comments:

Post a Comment