Monday, December 13, 2010

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास शेतकरी सभेचा विरोध

 कोकणातील जैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या सर्वांत मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पास शेतकरी सभेने विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणास धोका निर्माण होणार असल्याचे शेतकरी सभेचे एन. डी. पाटील यांनी सांगितले.
भारत आणि फ्रान्सदरम्यान जैतापूर येथे १० हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी जाणार असून, पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे. राज्यात ४३ लाख हेक्टर जमीन पडीक आहे. त्यांचा सेझसारख्या प्रकल्पासाठी वापर का होत नाही? सुपीक जमिनी घेऊन त्यांचा भाव वाढविण्याचा प्रयत्न उद्योगपती करतात, असे पाटील यांनी सांगितले.
राजगुरुनगरला उद्या मोर्चा
पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधासाठी राजगुरुनगरमध्ये ९ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. विमानतळ रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे सत्यशोधक शेतकरी संघर्ष समितीची किशोर ढमाले यांनी सांगितले

No comments:

Post a Comment