Monday, December 13, 2010

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

वादाच्या भोवऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यात माडबन-जैतापूर येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प उभारणीआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. १० हजार मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. आशियातील तो सर्वात मोठा असेल. पहिल्या टप्प्यात दोन संच उभे राहणार आहेत. ९७६ हेक्‍टर जमीन प्रकल्पासाठी राजापूर तालुक्‍यातील माडबन, जैतापूर या किनारपट्टी परिसरातील ९७६ हेक्‍टर जमीन आवश्‍यक आहे. त्यापैकी ९३८ हेक्‍टर जमिनीचे संपादन झाले आहे. प्रकल्पाविरोधात वेगवेगळ्या आंदोलनांबरोबरच न्यायालयीन पातळीवर लढा देण्याचा आंदोलकांचा पवित्रा आहे. फ्रान्सचे तंत्रज्ञान जैतापूर प्रकल्पाच्या अणुभट्ट्यांसाठी आवश्‍यक असलेले तंत्रज्ञान फ्रान्स पुरवणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलास सरकोझी नजीकच्या काळात भारत भेटीवर येणार आहेत. त्यापूर्वी या प्रश्‍नातील गुंते सोडवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. ऊर्जेची वाढती गरज अणुऊर्जा हा पर्याय काळाची गरज पाहता अनिवार्य असल्याचे मानले जाते. अनेक विकसित देशांनी अणुऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे. भारतासारख्या देशात तर सद्यस्थितीत विजेची मागणी व पुरवठा यात प्रचंड तफावत आहे.

No comments:

Post a Comment