Tuesday, December 7, 2010

शिवसेनेच्या 12 आमदारांनी घेतल्या माडबन, साखरी नाटे येथे जाहीर सभा

शिवसेनेच्या 12 आमदारांनी घेतल्या माडबन, साखरी नाटे येथे जाहीर सभा
दिनांक: 06-12-2010
मुंबई, (प्रतिनिधी) : भूमीपुत्रांची डोकी फोडून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारता येणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिला. त्याचबरोबर कोकणातील शिवसेनेच्या तब्बल 12 आमदारांना प्रकल्पस्थळी भेट देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार या 12 आमदारांनी साखरी नाटे, माडबन येथे जाहीर सभा घेऊन शिवसेना पूर्ण ताकदीनिशी भूमीपुत्रांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि दत्ताजी नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम. राजन साळवी, आम. सदानंद चव्हाण, आम. रवींद्र वायकर, आम. राजन विचारे, आम. प्रताप सरनाईक, आम. बालाजी किणीकर, आम. एकनाथ शिंदे, आम. दौलत दरोडा, आम. रुपेश म्हात्रे, आम. भरत गोगावले, आम. जीजी उपरकर, आम. किरण पावसकर, आम. अरविंद सावंत यांनी प्रकल्प स्थळी भेटी देऊन जाहीर सभा केल्या. यावेळी रत्नागिरी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, शशिकांत चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक हेही उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment