Sunday, December 5, 2010

जैतापूर उर्जा प्रकल्पाला कोकणातील शिवसेना आमदारांनीही नागपुरात केला विरोध

जैतापूर उर्जा प्रकल्पाला कोकणातील शिवसेना आमदारांनीही नागपुरात केला विरोध
दिनांक: 05-12-2010
नागपूर, (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील जैतापूर-माडबन अणूउर्जा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी राजापुरचे आमदार राजन साळवी यांच्या सोबत कोकणातील शिवसेनेच्या आमदारांनी नागपूर अधिवेशन स्थळी निदर्शने केली. 
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. परंतु प्रकल्पस्थळाच्या आजुबाजूच्या सर्वच गावातील ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या विरोधाची तीव्रता दाखविण्यासाठी प्रकल्पस्थळी जेलभरो आंदोलन झाले. त्यावेळी आ. राजन साळवी नागपुरात अधिवेशनासाठी असल्याने त्यांनी तेथेच निदर्शने करून या प्रकल्पाला विरोध दर्शविला. या निदर्शनांमध्ये कोकणातील आमदार जी. जी. उपरकर, सदानंद चव्हाण, भरत गोगावले, एकनाथ शिंदे, विनोद घोसाळकर, राजन विचारे, प्रमोद जठार यांनी भाग घेतला.
 

No comments:

Post a Comment