Sunday, December 5, 2010

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध प्रखर होऊ लागला, शनिवारी उग्र आंदोलन

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध प्रखर होऊ लागला, शनिवारी उग्र आंदोलन
दिनांक: 03.12.2010
राजापूर, (प्रतिनिधी) : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प लादण्याचेच प्रयत्न सुरु झाल्याने या प्रकल्पाविरोधात शनिवारी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पासाठी ज्यांच्या जागा घेण्यात आल्या आहेत, त्यातील बहुतेकांनी मोबदल्याचे धनादेश घेतलेले नाहीत. ते त्यांनी घ्यावेत यासाठी धमक्या देऊन सक्ती केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सरकारने हा प्रकल्प होणारच, अशी भूमिका घेतल्याने या आंदोलनाची धार वाढण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा समिती अध्यक्ष प्रवीण वाकणकर यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील ग्रामस्थांची तातडीची बैठकही घेण्यात आली आहे.

1 comment:

  1. it,s very wrong procidure followed by government because they are not understand public opinion. scientist has not decleared self opinion about that project . government only see their profit in that project but real thing is that not considered natureal care so i feel that project should be done when pure study about jaitapur natural beauty......

    ReplyDelete