Thursday, December 9, 2010

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रस्तावित देशातील सगळ्यात मोठ्या अणु उर्जा प्रकल्प ला विरोध करण्यासाठी शनिवारी जैतापूर परिसरातील हजारो शेतकरी,मच्छिमार रस्त्यावर उतरले. शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल अशी घोषणा आंदोलकांनी केलेली असताना पोलिसांनी आंदोलकांना ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्यास रोखल्याने ग्रामस्त आक्रमक झाले यातच पोलिसांनी महिला शेतकार्यांना फरफटतच अटक करण्यास सुरवात केल्याने वातावरण चिघळत गेले. संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक करत पोलिसांची गाडी फोडली २ पोलिसांना ही यात चोप मिळाला असून सुमारे २५० आंदोलनकत्र्यांना पोलिसांनी अटक केली. कोकणातील सामान्य शेतकरी, बागायतदार यांची शेकडो एकर जमीन सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. सरकारच्या या जबरदस्तीचा निषेध करण्यासाठी शनिवारी हजारो शेतकरी,बागायतदार,मच्छिमार रस्त्यावर उतरले होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शासनाने परवानगी दिल्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी होती. त्याचवेळी काही प्रकल्पग्रस्तांनी मदतीचे धनादेश स्वीकारल्या ने या नाराजीमध्ये वाढ झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी आज जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळपासून येथील वातावरण तापलेले होते. जैतापूर, माडबन आणि नाटे येथील ग्रामस्थ जमू लागल्यानंतर पोलिसांनी या परिसराला वेढा घातला होता. नाटे येथील आंदोलन कर्ते प्रकल्पस्थळी निघाल्यावर पोलिसांनी त्यांना अडवल्याने आंदोलनकत्र्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोडतोड केली. त्यामध्ये दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. सुमारे तीन ते चार हजार आंदोलनकर्ते मोर्चा काढून प्रकल्पस्थळी निघाले होते. दरम्यान, जैतापूर येथेही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता दिसल्याने या आंदोलनातील नेते आणि माजी न्यायाधीक्ष बी. जी. कोळसेपाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तीन एसटी गाड्या आणि दोन पोलिस व्हॅनमधून सुमारे २५० आंदोलनकत्र्यांना पोलिसांनी अटक करून हातिवले येथील कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या आंदोलनात सुमारे पाच हजार ग्रामस्थ आणि नाटेतील मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जैतापूरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment