Monday, December 13, 2010

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

 तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील प्रकल्पबाधित, प्रकल्पपीडित आणि परिसरातील समस्यांबाबत निर्णय घेण्यासाठी खासदार बळीराम जाधव यांनी न्यूक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांसोबत एका बैठकीचे आयोजन केले होते; परंतु व्यवस्थापकीय संचालकांच्या अनुपस्थितीमुळे ती स्थगित करण्यात आली. दरम्यान, प्रकल्पाशी संबंधित समस्यांना वाचा फोडण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पपीडित व प्रकल्पबाधितांनी दिला आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी बळीराम जाधव यांनी "एनपीसीआयएल'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. के. जैन यांच्याशी मंगळवारी (ता. 28) मुंबईमध्ये बैठकीसाठी वेळ निश्‍चित केली होती. या बैठकीला आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावीत, मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत, प्रशांत पाटील, अविनाश चुरी, प्रफुल्ल साने, प्रकल्पपीडित व प्रकल्पबाधितांचे प्रतिनिधी उपस्थित होते. "एनपीसीआयएल'चे अध्यक्षांशी थेट चर्चा करण्याची संधी दोन-अडीच वर्षांनी मिळाल्यामुळे बैठकीत काही प्रलंबित प्रश्‍नांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. परंतु बैठक सुरू होऊन अर्धा तास उलटला तरी अध्यक्ष न आल्याने उपस्थित संतप्त झाले. बैठकीत कोणत्याही विषयावर चर्चा न करण्याचा आणि अध्यक्षांना वेळ मिळेपर्यंत बैठक स्थगित करण्याचा निर्णय खासदार बळीराम जाधव यांनी घेतला.

दरम्यान "बीएआरसी'च्या अध्यक्षांसोबत एका अतिमहत्त्वाच्या व तातडीच्या बैठकीला एस. के. जैन यांना जावे लागल्याने ते तारापूर प्रकल्पपीडितांच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे सांगून उपस्थितांची माफी मागण्यात आली.

एकत्रित आंदोलन बैठकीसाठी तारापूरहून आलेले प्रकल्पबाधित व प्रकल्पपीडितांच्या प्रतिनिधींनी बैठकीसाठी "एनपीसीआयएल'च्या अध्यक्षांनी बगल देऊन आपल्या लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याची प्रतिक्रिया दिली. येत्या 10 ऑक्‍टोबरपासून टॅप्स 1 व 2 चे शटडाऊन सुरू होणार असून तेव्हापासून तारापूर अणुप्रकल्पाच्या विरोधात एकत्रितपणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment