Thursday, November 25, 2010

अणुउर्जा प्रकल्प : तिसऱ्यांदा धनादेश नाकारले


अणुउर्जा प्रकल्प : तिसऱ्यांदा धनादेश नाकारले
राजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील माडबन येथे होणाऱ्या नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या मूल्यांकनावेळी आमच्या जमिनींना आगी लावल्या त्याला जबाबदार कोण असा सवाल करत व भू संपादन प्रक्रियेला विरोध करत जमिनीचे धनादेश वाटप करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी माघारी पाठवले. यावेळी मिठगवाणे गावातील 67 जणांनी आपल्या हरकती नोंदवल्या.
राजापूर तालुक्यातील माडबन येथे जैतापूर अणुउर्जा प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या कामाच्या निमित्ताने माडबन परिसरात आलेल्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत स्थानिक ग्रामस्थांकडून कायम विरोध झालेला आहे. येथे होणाऱ्या अणुउर्जा प्रकल्पामुळे राज्याला भेडसावणारा विजेचा प्रश्न सुटतानाच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिक ग्रामस्थांनी मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे. या प्रकल्पामुळे अफाट समुद्र किनारा लाभलेल्या या निसर्गसंपन्न परिसराची राखरांगोळी होतानाच येथील शेतकरी, आंबा, काजू बागायतदार, मच्छिमार यांचे मोठे नुकसान होणार आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

No comments:

Post a Comment