Wednesday, November 24, 2010

कोकण वाचवा

कोकणात आता जैतापुर इथे शासनाने अणुऊर्जा प्रकल्पासाठी मंजूरी दिली आहे. याचा असा एक भाग की आज जर जैतापुर इथे हा प्रकल्प होत आहे तर अणुऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार होऊ शकतो. त्याचा दीर्घकालीन परिणाम आसपासच्या परिसरावर होऊ शकतो. प्रकल्प होणार असलेला परिसर कोकणच्या निसर्गरम्य भूमीत आहे. अणुऊर्जा म्हटले की किरणोत्साराचा धोका सर्वाधिक चिंतेचा असतो. कोकणच्या सागरी पर्यावरणाची अपरिमित हानी होऊ शकते. शिवाय प्रकल्पाची जागा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेले दिसत आहे. ऊर्जेची वाढती गरज असली तरीसुद्धा वीजनिर्मितीचा अणुऊर्जा हा एकमेव पर्याय नक्कीच होऊ शकत नाही. पर्यावरणाचा, सागरी प्राण्यांचा, शेतीचा तसेच मानवाचा बळी देऊन वीजनिर्मिती करणे हा काही योग्य पर्याय नव्हे.
या भट्टीत आण्विक कचरा साचल्यामुळे, भट्टीसह त्याज्य पदार्थांची विल्हेवाट लावणे आवश्‍यक ठरते. जगात आण्विक त्याज्य पदार्थांची विल्हेवाट ही गंभीर समस्या बनली आहे. रेडिओधर्मी राख आणि कचरा समुद्रात किंवा भूमीत सिलिंडरमध्ये बंद करून खोलवर गाडतात. आण्विक किरणांमुळे कर्करोग, वंध्यत्व येणे, मुले विकृत होणे, त्वचा जळणे असे परिणाम होऊ शकतात. हे सर्व आण्विक किरणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. अणुभट्टीतील इंधनाच्या राखेतीलकिरणोत्सर्गी द्रव्ये शेकडो वर्षे वातावरणात टिकून राहतात. त्यामुळे सृष्टीला तसेच मानव जातीला धोका पोचण्याची शक्‍यता असते. अमेरिकेने केलेल्या अणुचाचणी स्फोटामुळे किरणोत्सर्गी धुळीने हवा प्रदूषित होऊन बिकिनी बेटावर लक्षावधी समुद्रपक्षी नष्ट झाले.
हा प्रकल्प जैतापुर ते तरेळे , देवगड तालुका या पूर्ण भागात प्रस्थापित करण्य़ाची शासनाची योजना आहे. यामुळॆ जवळ्पास देवगड तालुका नस्ट होइल. याच बरोबर मालवण , गोवा पर्यत याचा परिणाम होइल.
आज जवळ्पास जगप्रसिद्ध असा हापुसचे उत्पादन हे याच भागात होते. या प्रकल्पामुळॆ तो ही काहि दिवसानॆ इतिहास होइल.
जर आज आपण योग्य ते पाऊल उचलले नाहि तर हे राजकारणी लोक स्वतः च्या स्वार्थासाठी आपल्याला देखिल विकुन टाकतील.
जरा या गोष्टीचा विचार करा व कोकण वाचावण्य़ात मदत करा.

No comments:

Post a Comment