Thursday, December 9, 2010

जैतापूर प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध


रत्नागिरी, ५ डिसेंबर
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला दिवसेंदिवस धार येत असल्याचे कालच्या उद्रेकावरून समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून प्रकल्पास तीव्र विरोध नोंदविला. हा जनक्षोभ एवढा प्रचंड होता की, पोलिसांच्या एका गाडीचीच संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली, तर लाठीमारासाठी पोलिसांनी लाठी उगारताच दंडुके घेऊन घरातून बाहेर पडलेल्या महिलांचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी चक्क नरमाईची भूमिका घेतली. भलामोठा फौजफाटा दिमतीला असतानाही प्रकल्पग्रस्तांनी यंत्रणेची तारांबळ उडवून दिली होती.
दरम्यान, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, रायगडच्या वैशाली पाटील, जनहित सेवा समितीचे प्रवीण गवाणकर, कोकण बचाव समितीचे डॉ. विवेक भिडे, मच्छीमार नेते अमजद बोरकर, प्रकाश वाघमारे आदींसह शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी एस.टी. बस व पोलीस गाडीवर दगडफेक केली. त्यात गाडय़ांचे नुकसान झाले, तर काही पोलिसांनाही किरकोळ दुखापत झाली.
जैतापूर प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रथमपासूनच तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प होऊ नये म्हणून यापूर्वी मोर्चे, जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. मात्र केंद्र व राज्य सरकारने हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उभारायचाच, असा निर्धार केला. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला आणि ग्रामस्थांनी शनिवारच्या आंदोलनाची हाक दिली. जैतापूर, माडबन, नाटे परिसरातील हजारो ग्रामस्थांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.
कोळसे-पाटील आले समुद्रमार्गे
नियोजित प्रकल्पस्थळाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांना प्रकल्पस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील हे मागील जेलभरो आंदोलनाच्या वेळी जसे समुद्रमार्गे आले होते, तसेच ते कालच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समुद्रमार्गेच आले. त्यांना पोलिसांनी अटक करताच आंदोलक अधिकच आक्रमक झाले व त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात काही पोलीस जखमी झाले. एका पोलीस गाडीसह एस.टी. गाडय़ांचे नुकसान झाले, तर रायगडच्या वैशाली पाटील या बुरखा घालून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात शेतकरी, बागायतदार यांच्याबरोबरच मच्छीमारही शेकडोंच्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. आंदोलनात सहभागी होता यावे म्हणून साखरीनाटे परिसरातील सर्व मच्छीमारांनी आपल्या बोटी शनिवारी बंद ठेवल्या होत्या. प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामस्थांच्या भावना सरकारला कळाव्यात, यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. तरीही सरकारने याची दखल घेतली नाही आणि प्रकल्पाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न केलाच तर त्या विरोधात आपण प्राण जाईपर्यंत लढा देऊ, असा निर्धार यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अणुऊर्जा प्रकल्प उभारू देणार नाही, असे जनहित सेवा समितीचे गवाणकर व बोरकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.    

Comments for Jaitapur Nuke Plant

रमाकांत दाणी  - सकाळ वृत्तसेवा नागपूर -  राज्याच्या सर्वच भागात वीजप्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, कुठल्याही विशिष्ट भागावर अन्याय करण्याचे धोरण बाळगले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. डिसेंबर 2012 पर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या दृष्टीने वीजनिर्मितीत वाढ करण्याचे नियोजन असून, कुठल्याही परिस्थितीत ते पूर्ण केले जाईल. भारनियमनमुक्ती करताना मोठे प्रकल्प (1 हजार मेगावॉटच्या वरचे) असलेल्या जिल्ह्यांना प्रधान्य दिले जाईल, असेhttp://www.globalmarathi.com/SearchNews.aspx?tag=%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0ही त्यांनी सांगितले.
Thursday, December 09, 2010 AT 07:27 PM (IST)
राजेश चरपे  - सकाळ वृत्तसेवा नागपूर -  जैतापूर अणुऊर्जा आणि औष्णिक वीजप्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ आणि कोकणाला उद्‌ध्वस्त करण्याचे षड्‌यंत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने रचले आहे. राज्यात फक्त चार हजार मेगावॉट विजेची टंचाई असताना, निर्मिती मात्र दीड लाख मेगावॉटची केली जात आहे. ही बाब अनाकलनीय असून, बळजबरीने शेतकऱ्यांचे पाणी आणि जमिनी हिसकावून घेतल्यास ठोशास ठोशाने उत्तर देण्यात येईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेचे रामदास कदम यांनी दिला.
Thursday, December 09, 2010 AT 07:08 PM (IST)
पुणे -  जैतापूर आण्विक वीज प्रकल्प रद्द करा आणि अटकेत असलेल्या आंदोलकांची सुटका करा, अशी मागणी कोकणवासीय महिला, तरुण आणि कष्टकरी महिलांनी "कॉंग्रेस आय'कडे केली आहे. कोकणवासीय महिला, तरुण आणि कष्टकरी महिलांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ज्ञानेश्‍वर पादुका चौकातून कॉंग्रेस भवनपर्यंत मोर्चा काढला होता. कोकणचा विकास करायचा असेल तर, शेती, मच्छीमारी व जंगल संपत्तीचा विकास करा. मात्र अणुभट्या कोकणात आणू नका. अशा मागणीचे निवेदन त्यांनी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्याकडे दिले.
Wednesday, December 08, 2010 AT 07:55 PM (IST)
आठवड्यातून दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी घेणार राजापूर- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील जेलभरो आंदोलन प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झालेल्या चौदांपैकी बारा जणांना रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायाधीश दिवाकर रत्नाकर यांनी आज प्रत्येकी 15 हजाराच्या वैयक्तिक जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना आठवड्यातून दोनवेळा नाटे पोलिस ठाण्यावर हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
Wednesday, December 08, 2010 AT 07:40 PM (IST)
प्रकल्पाला विरोध नसल्याचा भाजपचा खुलासा नवी दिल्ली- जैतापूर या देशातील पहिल्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध सुरू केला असला, तरी याच शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मात्र जैतापूरला पक्षाचा विरोध नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. "आधी समाधानकारक पुनर्वसन मग प्रकल्प,' अशी भूमिकाही पक्षाने घेतली असली, तरी या निमित्ताने युतीतील दरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Wednesday, December 08, 2010 AT 07:10 PM (IST)
रत्नागिरी -  गेल्या काही वर्षांत कोकणात कमी झालेला दबदबा निर्माण करण्यासाठी शिवसेनेने आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्‌द्‌याला हात घालून कोकणवासियांची मने जिंकण्याचा प्रयोग सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प हाकलून लावू, असे घोषित करुन शिवसेनेने प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नारायण राणे यांनाही शह देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसत आहे. या प्रयोगाचा पहिला प्रयोग कालच (ता. 6) राजापूर येथील नाट्ये आणि माडबन येथे झाला.
Tuesday, December 07, 2010 AT 06:40 PM (IST)
  -  जैतापूर अणुविद्युत प्रकल्पाला मिळालेला हिरवा कंदील आणि रत्नागिरी गॅस पॉवर प्रकल्पाची उत्तम स्थिती पाहता धोपावे येथील औष्णिक विद्युत प्रकल्प बहुधा रद्द होण्याची चिन्हे आहेत. अधिकृतपणे याबाबतची घोषणा राज्य सरकार, महाजेनकोकडून झालेली नसली, तरी तशी शक्‍यता आहे. गुहागर तालुक्‍यात रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर धोपावे, वेलदूर, पवारसाखरी या ग्रामपंचायतींच्या हद्दीत औष्णिक विद्युत प्रकल्प नियोजित आहे.
Tuesday, December 07, 2010 AT 06:40 PM (IST)
भारत-फ्रान्समध्ये महत्त्वपूर्ण करार भारत भेटीवर आलेले फान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी आणि प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यात काल बोलणी झाली. यावेळी उभय देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर चर्चा करून मान्यता देण्यात आली. नागरी अणु सहकार्य, संरक्षण, अवकाश विज्ञान, शिक्षण व संशोधन या क्षेत्रांशी हे करार संबंधित आहेत. फ्रान्सच्या मदतीने महाराष्ट्रात जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पात दोन अत्याधुनिक स्वरुपाच्या अणु भट्‌ट्या स्थापन करण्याच्या करारावरही सह्या झाल्या.
Tuesday, December 07, 2010 AT 10:48 AM (IST)
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जर जैतापूर अणुप्रकल्प स्थानिकांच्या माथी मारत असतील, तर पृथ्वीराजांचे पार्सल दिल्लीला परत पाठवू, असा इशारा शिवसेनेचे आ. सुभाष देसाई यांनी नाटे आणि माडबन येथील सभेत दिला.
Tuesday, December 07, 2010 AT 05:47 AM (IST)
जैतापूर येथील प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन केले, तर तेथील नियोजित अणु ऊर्जा प्रकल्पाला आपला पाठिंबा राहील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पुण्यात स्पष्ट केले.
Tuesday, December 07, 2010 AT 05:47 AM (IST)
भारत व फ्रान्स यांच्यामध्ये सोमवारी अणुभट्ट्या उभारण्याबाबत करार झाला. या करारानुसार फ्रान्स भारतात सहा अणुभट्ट्या उभारणार असून यातील पहिल्या दोन भट्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जैतापूर प्रकल्पाला मिळणार आहेत.
Tuesday, December 07, 2010 AT 05:47 AM (IST)
मुंबई -  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची वास्तववादी परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रदेश भाजपने एक समिती नेमली असून पक्षाचे ठाणे विभाग अध्यक्ष सुरेश हावरे त्याचे निमंत्रक असतील. जैतापूर प्रकल्पाविरोधातील आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून सरकारने दडपण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. हावरे यांची समिती प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार व विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना या आठवड्यात अहवाल सादर करणार आहे.
Monday, December 06, 2010 AT 06:47 PM (IST)
महाराष्ट्राची वीजेची समस्या सोडवणारा महत्त्वाकांक्षी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये आज (सोमवारी) सहकार्य करारावर सह्या झाला. जैतापूरकरांचा कराराला विरोध असला तरी केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
Monday, December 06, 2010 AT 05:47 PM (IST)
नवी दिल्ली, ६ डिसेंबर/विशेष प्रतिनिधीभारत-फ्रान्स यांच्यातील ऐतिहासिक अणुसहकार्य करारामुळे जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी दोन अणुभट्टय़ा मिळणार आहेत. या करारासह पंतप्रधान मनमोहन सिंग आणि फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सारकोझी यांच्या उपस्थितीत आज दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये उभय देशांमध्ये एकूण सात करार करण्यात आले. ...
Monday, December 06, 2010 AT 02:31 PM (IST)
जैतापूर अणुवीज प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान शनिवारी अटक झालेल्या १३०० आंदोलकांची रविवारी सुटका करण्यात आली. मात्र आंदोलनाच्या नेत्यांपैकी माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, वैशाली पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
Sunday, December 05, 2010 AT 08:20 PM (IST)
राजापूर -  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी काल (ता. 4) जेलभरो आंदोलन झाल्यानंतर आज माडबन पंचक्रोशीमध्ये शांतता आहे मात्र तणावाचे वातावरण कायम आहे. प्रकल्पाचे सध्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्वीचा असलेला पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. कालच्या जेलभरो आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांपैकी 1 हजार 130 आंदोलकांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये जिल्हाबंदी घातलेले माजी सरन्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील आणि कोकण बचाव समितीच्या वैशाली पाटील यांचा समावेश आहे.
Sunday, December 05, 2010 AT 06:40 PM (IST)
जैतापूर -  केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मंजूरीमुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असताना काल (ता. 4) अभूतपूर्व झालेल्या जेलभरो आंदोलनामुळे प्रकल्पाला असलेला विरोध दाखवून दिला. या पार्श्‍वभूमीवर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आज दुपारी जैतापूर पंचक्रोशीतील गावांना भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. यावेळी राजन साळवी म्हणाले, ""जात, धर्म आदी गोष्टींचा विचार न करता प्रकल्पग्रस्त म्हणून आपण सर्वजन एकत्र येऊन या अणुउर्जा प्रकल्पाला कडाडून विरोध करु या.
Sunday, December 05, 2010 AT 06:40 PM (IST)
कोकणातील जैतापूर येथे अणुउर्जा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांसोबतच आता शिवसेनेने देखील विरोध केला आहे. भूमिपुत्रांची डोकी फोडून जैतापूर प्रकल्प उभारता येणार नाही, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Sunday, December 05, 2010 AT 05:50 PM (IST)
नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून सरकार आणि नागरिक यांच्यातील संघर्ष वाढीस लागला असून, फ्रान्सचे अध्यक्ष निकोलास सारकोझी यांच्या भारतभेटीचा योग साधून माडबन येथे शनिवारी 'जेलभरो' आंदोलन करण्यात आले. यावेळी १३०० आंदोलनर्कत्यांना अटक करण्यात आली.
Sunday, December 05, 2010 AT 06:56 AM (IST)
विकासप्रकल्प पर्यावरणविरोधी आहेत ही समजूत जनमानसात रुजते आहे. पण या विषयाकडे काळा आणि पांढरा या दोन रंगातच पाहिले जाते. या दोन टोकाच्या रंगांमध्ये करड्या रंगाच्या अनेक छटा आहेत, हे आपण विवेकबुद्धीने समजून घेणार आहोत की नाही, हा प्रश्न जैतापूर प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उभा राहिला आहे...

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रस्तावित देशातील सगळ्यात मोठ्या अणु उर्जा प्रकल्प ला विरोध करण्यासाठी शनिवारी जैतापूर परिसरातील हजारो शेतकरी,मच्छिमार रस्त्यावर उतरले. शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल अशी घोषणा आंदोलकांनी केलेली असताना पोलिसांनी आंदोलकांना ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्यास रोखल्याने ग्रामस्त आक्रमक झाले यातच पोलिसांनी महिला शेतकार्यांना फरफटतच अटक करण्यास सुरवात केल्याने वातावरण चिघळत गेले. संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक करत पोलिसांची गाडी फोडली २ पोलिसांना ही यात चोप मिळाला असून सुमारे २५० आंदोलनकत्र्यांना पोलिसांनी अटक केली. कोकणातील सामान्य शेतकरी, बागायतदार यांची शेकडो एकर जमीन सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. सरकारच्या या जबरदस्तीचा निषेध करण्यासाठी शनिवारी हजारो शेतकरी,बागायतदार,मच्छिमार रस्त्यावर उतरले होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शासनाने परवानगी दिल्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी होती. त्याचवेळी काही प्रकल्पग्रस्तांनी मदतीचे धनादेश स्वीकारल्या ने या नाराजीमध्ये वाढ झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी आज जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळपासून येथील वातावरण तापलेले होते. जैतापूर, माडबन आणि नाटे येथील ग्रामस्थ जमू लागल्यानंतर पोलिसांनी या परिसराला वेढा घातला होता. नाटे येथील आंदोलन कर्ते प्रकल्पस्थळी निघाल्यावर पोलिसांनी त्यांना अडवल्याने आंदोलनकत्र्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोडतोड केली. त्यामध्ये दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. सुमारे तीन ते चार हजार आंदोलनकर्ते मोर्चा काढून प्रकल्पस्थळी निघाले होते. दरम्यान, जैतापूर येथेही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता दिसल्याने या आंदोलनातील नेते आणि माजी न्यायाधीक्ष बी. जी. कोळसेपाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तीन एसटी गाड्या आणि दोन पोलिस व्हॅनमधून सुमारे २५० आंदोलनकत्र्यांना पोलिसांनी अटक करून हातिवले येथील कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या आंदोलनात सुमारे पाच हजार ग्रामस्थ आणि नाटेतील मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जैतापूरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रस्तावित देशातील सगळ्यात मोठ्या अणु उर्जा प्रकल्प ला विरोध करण्यासाठी शनिवारी जैतापूर परिसरातील हजारो शेतकरी,मच्छिमार रस्त्यावर उतरले. शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल अशी घोषणा आंदोलकांनी केलेली असताना पोलिसांनी आंदोलकांना ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्यास रोखल्याने ग्रामस्त आक्रमक झाले यातच पोलिसांनी महिला शेतकार्यांना फरफटतच अटक करण्यास सुरवात केल्याने वातावरण चिघळत गेले.

संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक करत पोलिसांची गाडी फोडली काही पोलिसांना ही यात चोप मिळाला.

कोकणातील सामान्य शेतकरी, बागायतदार यांची शेकडो एकर जमीन सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतली. सरकारच्या या जबरदस्तीचा निषेध करण्यासाठी शनिवारी हजारो शेतकरी,बागायतदार,मच्छिमार रस्त्यावर उतरले होते. 

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आता १७ मार्चला रत्नागिरीत भव्य मोर्चा



कोकणात येऊ घातलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी येत्या १७ मार्चला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा प्रकल्पविरोधी समिती व डाव्या लोकशाही समितीने केली आहे.
कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समिती आणि रिपब्लिकन डावी लोकशाही समिती यांच्या वतीने या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. रिडालोसचे अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले हे यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले असता त्यांनी जैतापूर- माडबन (ता. राजापूर) येथील प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली होती.
 त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र कोकणातील शिमगोत्सव आदी काही कारणांमुळे ‘तो’ नियोजित मोर्चा लांबणीवर ढकलण्यात आला होता. आता हा मोर्चा बुधवार, १७ मार्चला काढण्यात येणार असून त्यासाठी रिडालोसचे नेते रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
हा मोर्चा अतिविराट असणार आहे. यात कोकणातील अणुऊर्जाविरोधी जनतेने मोठय़ा संख्येने सामील व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
भाजपचे महागाईविरोधात शनिवारी धरणे आंदोलन
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवार, १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महागाई विरोधात धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या व प्रदेश चिटणीस माजी आमदार बाळ माने उपस्थित राहणार आहेत.गेल्या काही महिन्यात महागाईने देशभर थैमान घातले असून केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारकडे महागाई नियंत्रणात आणू शकणारे ठोस असे धोरणच नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या असून सर्वसामान्य माणसाचे जीवन असह्य झाले आहे. या विरोधात उठाव करण्याची नितांत गरज असून अशा भ्रष्ट व निष्क्रिय सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जयस्तंभ, रत्नागिरी येथे आयोजित धरणे आंदोलनाला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. नाना शिंदे व तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.       

    अणुसंघर्ष पेटला.. जैतापूरात आंदोलन


    नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून सरकार आणि नागरिक यांच्यातील संघर्ष वाढीस लागला असून, फ्रान्सचे अध्यक्ष निकोलास सारकोझी यांच्या भारतभेटीचा योग साधून माडबन येथे शनिवारी 'जेलभरो' आंदोलन करण्यात आले. यावेळी १३०० आंदोलनर्कत्यांना अटक करण्यात आली. संतप्त नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले, तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक होऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमाराचे अस्त्र उगारले.

    हा नियोजित प्रकल्प फ्रान्समधील अरेवा नावाच्या कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे. जैतापूर प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध आहे. पर्यावरणप्रेमीही त्यांच्या पाठीशी उभे आहेत. या प्रकल्पास केंदाच्या पर्यावरण खात्याने काही अटींसह नुकताच हिरवा झेंडा दाखवला. यासंदर्भातील अंतिम करारावर पुढील आठ महिन्यांत स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. पहिले युनिट २०१८ पर्यंत कार्यरत होईल.

    या पार्श्वभूमीवर शनिवारी माडबनमध्ये प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन झाले. या आंदोलनात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि आसपासच्या गावांसह मुंबईतील आंदोलकांचाही सहभाग होता. नाटे, जैतापूर, विजयदुर्ग, राजापूर, रत्नागिरीतील मच्छिमार मासेमारी बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले होते. जवळपास २ हजार मच्छिमार आंदोलनात उतरल्याचे जनहित सेवा समितीने म्हटले आहे. जैतापूर नाटे येथील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी साडेतीन हजारहून अधिक आंदोलनर्कत्यांना ताब्यात घेतले, तर १३०० जणांना अटक केली. निवृत्त न्यायमूतीर् बी. जी. कोळसे-पाटील, वैशाली पाटील, डॉ. विवेक भिडे, मधु मोहिते, जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आंदोलनर्कत्यांना राजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांना राजापूर कोर्टापुढे सादर केले जाईल. 

    जैतापूर-माडबन अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीविरोधात जनहित सेवा समितीने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला हिंसक वळण लागले.


    जैतापूर-माडबन अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीविरोधात जनहित सेवा समितीने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला हिंसक वळण लागले.

    Share
    राजापूर/नाटे- जैतापूर-माडबन अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीविरोधात शनिवारी जनहित सेवा समितीने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनाचे नेतृत्व करणा-या पदाधिका-यांना जमावावर नियंत्रण राखता न आल्याने संतप्त जमावाने एक एसटी बसपोलिसांची एक सुमो व एक पोलीस व्हॅन यांना लक्ष्य करीत त्यांची मोडतोड केली. पोलिसांच्या लाठीमाराचा प्रतिकार आंदोलनकर्त्यांनी दगडांनी केल्याने चार पोलिस अधिका-यांसह चार पोलिस कर्मचारी असे आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.  

     पोलिसांनी जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांच्यासह मच्छीमार नेते अमजद बोरकरवैशाली पाटीलडॉ. विवेक भिडेप्रकाश वाघधरे यांच्यासह समुद्रमार्गे आंदोलनस्थळी दाखल होणा-या माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटीलअरुण वेळासकर,मधु मोहिते यांच्यासह सुमारे 1250 स्थानिक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांना रात्री उशिरा वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आले. दरम्यानशांततामय मार्गाने आंदोलन करणा-या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी भडकवल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप प्रवीण गवाणकर यांनी केला.